Latest

MI vs RR : राजस्थानने घरच्या मैदानावर मुंबईला धूळ चारली; 6 गडी राखून विजय

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी (दि.१) झालेल्या 17व्या हंगामात मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर राजस्थानने 15.4 षटकात धूळ चारली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात मुंबईने ९ गडी गमावत २० षटकात १२५ धावा केल्या. १२६ धावांचे लक्ष राजस्थानसमोर ठेवले. राजस्थानने 6 गडी राखून 15.4 षटकात हे आव्हान पूर्ण केले. रियान पराग आणि शुभम दुबे यांनी विजयाच्या यशात चमकदार कामगिरी केली. रियान पराग ३९ चेंडूत ५४ धावा करून नाबाद राहिला. त्याने ५ चौकार तीन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. शुभम दुबेने ६ चेंडूत ८ धावा करत परागला विजयासाठी साथ दिली. विजयी कामगिरीमुळे राजस्थानने सहा गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान गाठले आहे. मुंबईला IPL 24 च्या या स्पर्धेत आतापर्यंत एकही विजय मिळवता न आल्याने ती आता 10 व्या स्थानावर गेली आहे.

मुंबईला चौथा झटका; आर.आश्विन आऊट

12.2 षटकात राजस्थानला मुंबईने चौथा झटका दिला आहे. आर.आश्विनला आकाश मढवालने १६ धावांवर तिलक वर्माच्या हस्ते झेलबाद केले. आर. आश्विन १६ चेंडूत १६ धावा करून बाद झाला.

राजस्थानला तिसरा धक्का; संजू सॅमसन पाठोपाठ बटलर आऊट

आकाश मढवालने संजूपाठोपाठ बटलरशी विकेट घेतली. 6.3 षटकात जोश बटलरला आकाश मढवालने चावलाच्या हस्ते झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 13 धावा केल्या. त्याआधी 4.2 षटकात संजू सॅमसन 12 चेंडूत 10 धावा काढून क्रीनबॉल्ड झाला. 

राजस्थानला पहिला धक्का; यशस्वी जायस्वाल बाद

राजस्थानला पहिला धक्का 10 धावांवर बसला. क्वेना माफाकाने पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर यशस्वी जायस्वालला बाद केले. त्याला केवळ 10 धावा करता आल्या.

मुंबई इंडियन्सचे राजस्थान रॉयल्सला 126 धावांचे लक्ष्य

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी 17व्या हंगामातील सर्वात कमी धावसंख्या झाली. मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर 20 षटकांत 9 विकेट्सवर 125 धावाच करता आल्या. तत्पूर्वी, चेन्नईविरुद्ध गुजरातचा संघ केवळ 143 धावा करू शकला होता. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलने 3-3 बळी घेतले. नांद्रे बर्जरलाही 2 विकेट मिळाल्या. मुंबईकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही, तर तिलक वर्माने 32 आणि हार्दिक पंड्याने 34 धावा केल्या. माजी कर्णधार रोहित शर्मासह नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस हे गोल्डन डक ठरले. हे तिघेही पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाले. बोल्टने तिघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

मुंबईला सातवा झटका; तिलक वर्मा बाद

मुंबईला 13.2 षटकात राजस्थानने सातवा झटका दिला आहे. तिलक वर्माला 32 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला असून त्याला युजवेंद्र चहलने आर. अश्विनच्या हस्ते झेलबाद केले. सध्या टीम डेव्हिड आणि जेराल्ड कोएत्झी क्रीजवर होते.

मुंबईला सहावा धक्का; पियुष चावला बाद

मुंबईला पियुष चावलाच्या रूपाने सहावा धक्का राजस्थानने दिला आहे. आवेश खानने त्याला शिमरोन हिटमायरच्या हस्ते 3 धावांवर झेलबाद केले.

मुंबईचा निम्मा संघ तंबूत; हार्दीक पांड्या आऊट

मुंबईच्या चार विकेटस् पडल्यांनतर हार्दीक पांड्याने सावध सुरूवात करत डाव सावरण्याच प्रयत्न केला होता. मात्र षटकार मारायच्या नादात तो ३४ धावांवर बाद झाला. युजवेंद्र चहल याने त्याला रोव्हमन पॉवेलच्या हस्ते झेलबाद केले.

तिसऱ्या षटकात मुंबईच्या चार विकेट; ईशान किशन तंबूत परतला

मुंबईला राजस्थानने ईशान किशनच्या रूपाने चौथा धक्का दिला आहे. नांद्रे बर्जरने 29 धावांवर इशान किशनला बाद केले. या सामन्यात त्याला 16 धावा करता आल्या. हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.

तिसऱ्या षटकात मुंबईला तिसरा धक्का; डेवाल्ड ब्रेविस आऊट

मुंबईला राजस्थानने  डेवाल्ड ब्रेविसच्या रूपाने तिसरा धक्का दिल्ला आहे.  नांद्रे बर्गरने त्याला क्रीनबोल्ड केले.

पहिल्याच षटकात बोल्टकडून मुंबईला दोन धक्के; रोहितसह नमन शुन्यावर आऊट

मुंबईची सुरूवात खराब झाली आहे. रोहित शर्माबरोबर नमन धीर आल्याबरोबर पॅव्हेलियनमध्ये परतला. दोघेही शुन्यावर बाद झाले. रोहितला बोल्टने सॅमसनच्या हस्ते झेलबाद केले. तसेच नमन धीर एलबीडब्लू आऊट झाला.

मुंबई इंडियन्स प्लेईंग 11

रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेविड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मढवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका

इम्पैक्ट सब: डेवाल्ड ब्रेविस, नुवान तुषारा, रोमारियो शेफर्ड, नेहल वढेरा, शम्स मुलानी।

राजस्थानची प्लेईंग 11 

यशस्वी जायस्वाल, जोश बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, शिमरोन हिटमायर, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल

इम्पैक्ट सब: रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT