Latest

राज ठाकरे : सुरुवातीला जे बोलतो ते कटू जरी असले तरी तेच सत्य असते

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क

राज ठाकरे यांचा नाशिक दौ-याचा दुसरा दिवस असून आज त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत मराठी माणसांच्या प्रश्नांवरील मुद्दे अधोरेखित केले.

यावेळी निवडणूकीबाबत पुढे ठरवू काय करणार अजून वेळ आहे. सर्व जागा लढवाव्यात अशी मागणी पक्षातून होते आहे. कुठे का निवडणूक लढवावी याबाबत चाचपणी करत आहोत. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहेत, आम्हीही करतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

2014 मध्ये देखील रागातून मतदान झाले होते. आजपर्यंत विविध प्रश्नावर निवडणूका झाल्या आता उत्तरांवर निवडणूका व्हायला हव्यात. 1995 मध्ये विधानसभेत शिवसेना भाजपाला मतदान केले होते.
मराठा आरक्षणाबाबत सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत. मराठी बांधव मोर्चाला गेले त्यांना नेमकी माहिती आहे का नेमकी काय झाले. जरांगे यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळणे अशक्य आहे. मनाप्रमाणे मागण्या मान्य झाल्या मग आता आंदोलन कशाला त्यामुळे विजय कशाचा झाला हे कळाले का.
गटबाजी प्रत्येक पक्षात असते. ती सत्ता पक्षात दिसून येत नाही. आमचा उघडा कारभार असल्याने तो लगेच दिसून येतो.

ईडीसारख्या कारवाया भविष्यात भाजपा पक्षाला परवडणाजोग्या नाहीत. ईडी कारवाईवरुन राज यांनी केंद्रसरकारला निशाण्यावर धरले

रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत मग टोल वसुली कशी होते. – कुठल्याही टोलनाक्याला विरोध नाही. टोलनाक्याबाबत उद्या 3 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. वस्तुस्थिती तपासून पाहणार आहेत की नाही. टोलच्याप्रक्रीयेत पारदर्शकताच नाही.

मराठी माणसाला त्याच्याच राज्यात राहायला घर नाही. पेट्रोल अशा विविध प्रश्नांवर बोलायला कोणीही तयार नाही. महसूल कोणाच्या खिशात जातो आहे. मराठी माणसांचे प्रश्न विचारत घेतली जात नाही. असे राज ठाकरे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT