Latest

राज्यातील अवकाळीचा मुक्काम पाच दिवसांनी वाढला

अमृता चौगुले

पुणे : अवकाळीचा मुक्काम पाच दिवसांनी वाढला असून, 2 मे पर्यंत राज्यातील सर्वंच भागांत अवकाळी पाऊस राहील. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात जोर जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा मे महिन्याची सुरुवात पावसाने होत आहे. आठवडाभर अवकाळीचे वातावरण राहणार असून, आगामी चार दिवस राज्यात गडगडाटासह अवकाळीचा जोर राहणार आहे.

प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील शहादा, चोपडा, यावल या भागांसह संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर जास्त राहील. 28 एप्रिल रोजी कोल्हापूर, सांगली या भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणात मात्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

विदर्भात जास्त पाऊस..

आगामी चार दिवस विदर्भात पावसाचा वेग जास्त राहील. यात यवतमाळ चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागांत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

उष्णतेची लाट नाही..

पुढील तीन दिवस राज्यात कुठेही उष्णतेची लाट नाही. मात्र, कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होईल. काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे पाऊस व गारपिटीची शक्यता महाराष्ट्रात वाढली आहे.

SCROLL FOR NEXT