Latest

पिंपरीत उन्हाळ्यात पावसाच्या धारा

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे): पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी (दि. 13) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर कडक उन्हामुळे घामाघूम झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. बुधवारी शहरात 41 अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे उकाड्याने नागरिक बैचेन झाले होते. गुरुवारी तापमान 39 अंश होते.

सायंकाळी सहानंतर वातावरणात बदल झाला आणि ढग दाटून विजेचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर थोड्या वेळाने पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला तुरळक पावसाच्या सरी कोसळल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. रात्री आठनंतर जोरदार पावसाळा सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावरील विक्रेत्यांची सामान आवरण्याची पळापळ झाली. कामावरून सुटणार्‍या चाकरमान्यांची एकच त्रैधातिरपीट उडाली. अनेकांना भिजत घरी गाठावे लागले. उकाड्याने त्रस्त झालेल्या बच्चे कंपनींनी भिजण्याचा आनंद घेतला. विजांचा कडकडाट होत असल्याने बर्‍याच जणांनी बाहेर जाण्याचे टाळले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी होती. वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणचे फ्लेक्स पडले होते.

SCROLL FOR NEXT