Latest

रत्नागिरी : कोकण किनारपट्टी भागात उघडीप

दिनेश चोरगे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  कोकण किनारपट्टी भागातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतली आहे. सध्या पावसासाठी प्रतिकुल वातावरण तयार झाले असल्याने कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, रायगड तसेच पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, या भागात पावसाची उघडीपच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, घाटमाथा व मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता बहुतेक भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, सिंधदुर्ग या या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

दरम्यान, रविवारसह सोमवारीही पावसाने जळपास सर्वच भागात उसंत घेतली होती. काही भागात हलक्या सरीही झाल्या. सोमवारी संपलेल्या 24 तासात म्हणजे सकाळी 8.30 वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 23.88 मि.मी.च्या सरासरीने एकूण 214.90 मि.मी. पाऊस झाला. यामध्ये मंडणगड तालुक्यात 24.90 मि.मी. दापोलीत 21.60, खेडमध्ये 27.20, गुहागरात 25.20 मि.मी., चिपळूण तालुक्यात 29.10 मि.मी. , संगमेश्वर तालुक्यात 24.40 मि.मी., रत्नागिरीत 16.10, लांजात 21.20 मि.मी. आणि राजापूर तालुक्यात 25.20 मि.मी. पावसाची नोद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 2130.81 मि.मी.च्या सरासरीने पावसाने 19 हजार 177.30 मि.मी.ची एकूण मजल गाठली आहे. गतवर्षी जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात पावसाने 1708.34 मि.मी.च्या सरासरीने 15, 375 मि.मी.चा एकूण टप्पा गाठला होता.

SCROLL FOR NEXT