Latest

पिंपरी: शहरात सलग दुसर्‍या दिवशी पावसाची हजेरी

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: शहरात बुधवारी (दि. 6) सलग दुसर्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच सुरू झालेला पाऊस दिवसभर काही काळ उघडीप घेत पुन्हा बरसत होता. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने कामावर जाणार्‍या चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली. तसेच, दुचाकीवर मुलांना शाळेत सोडण्यास जाणार्‍या पालकांचीही गैरसोय झाली. पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. दिवसभर पाऊस थांबून-थांबून पडत होता.

त्यामुळे रेनकोट, छत्री न घेता घराबाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खुपच कमी गर्दी पाहण्यास मिळाली. हवामान विभागाने पुणे परिसरात पुढील सहा दिवस आकाश सामान्यतः किंवा संपूर्णतः ढगाळ राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

SCROLL FOR NEXT