Latest

रेल्वेचा पुणे विभाग सुसाट ! महिन्यात 143 कोटींचा महसूल

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रेल्वेच्या पुणे विभागामार्फत प्रवाशांची वाहतूक जोरात सुरू असून, रेल्वे गेल्या नोव्हेंबर 2023 या एकाच महिन्यात 143 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यात फक्त प्रवासी वाहतुकीतूनच विभागाला 99 कोटी 76 लाखांच्या महसूल प्राप्त आहे.
दिवाळी, छठ पूजा हे सण असल्याने रेल्वे गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. त्याच काळात रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीकरिता अतिरिक्त गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाला हा एकाच महिन्यात भरघोस महसूल प्राप्त झाला आहे. या कामगिरीबद्दल रेल्वेच्या पुणे विभागाचे रेल्वेच्या वर्तुळात कौतुक होत आहे.विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनात आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला यांच्या नेतृत्वाचे सक्रिय प्रयत्न यामुळे रेल्च्वेच्या पुणे विभागाने ही कामगिरी केली.

संबंधित बातम्या :

मालवाहतूक वाढली
तिकीट तपासणीमध्ये पुणे विभागाला नोव्हेंबर महिन्यात 3 कोटी 09 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला. त्यासोबतच विविध कोचिंग कामांच्या माध्यमातून 11 कोटी 25 लाख रुपये, मालगाड्यांच्या वाहतुकीतून 31 कोटी 11 लाख रुपये महसूल मिळाला. मालवाहतुकीत पुण्यातून ऑटोमोबाईल्स, पेट्रोलियम पदार्थ आणि साखरेच्या मालगाड्यांची अधिक वाहतूक करण्यात आली.

पार्सलमधून 2 कोटी मिळाले
पार्सलच्या माध्यमातून 2 कोटी 46 लाख रुपयांचा, तर विविध वाणिज्य कामांमधून 1 कोटी 57 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. अशाप्रकारे रेल्वेच्या पुणे विभागाने नोव्हेंबर 2023 महिन्यात या एकाच महिन्यात 143 कोटी 69 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

SCROLL FOR NEXT