Latest

Railway News : रेल्वे व्हिल कारखान्याचे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज उद्घाटन

अंजली राऊत

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा
एकलहरे रोडवरील रेल्वे ट्रॅक्शन येथे (Traction Machine Workshop Nashik) उभारण्यात आलेल्या व्हिल रिपेरिंग कारखान्याचे (Wheel Repairing Factory) सोमवारी (ता.२६) सकाळी दहा वाजता रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे आदी उपस्थितीत राहणार आहेत.

कारखान्यात प्रतिवर्ष पाचशे रेल्वेच्या व्हिलची दुरुस्ती होणार असून, अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. ट्रॅक्शन परिसरात रेल्वेची शेकडो एकर जमीन अनेक वर्षांपासून पडून आहे. या जमिनीवर रेल्वेचा व्हिल रिपेरिंग कारखाना उभारण्यात यावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला होता. खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने कारखाना उभारणीच्या प्रस्तावास केंद्राकडून मान्यता मिळाली. रेल्वे विभागाने पन्नास कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. यातूनच कारखान्याची उभारणी पूर्ण झाली आहे. (Traction Machine Workshop Nashik)

SCROLL FOR NEXT