Latest

Raigad LokSabha Election : सोशल मीडियावर निवडणुकीचे वातावरण रंगात

अनुराधा कोरवी

मुरुड जंजिरा ः पुढारी वृत्तसेवा :  लोकसभेची निवडणूकीची तारीख कधी ही निवडणूक आयोग जाहीर करील तेव्हा करील पण आतापासूनच फेसबुक, व्हाटसप या सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम तापू लागले आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर समर्थकांचा ग्रुपवर जुंपत असल्याने सर्वाची करमणूक असली तरी यामध्ये निवडणूक जवळ येईपर्यंत अ‍ॅडमिनचे धकधक तेवढीच वाढु लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक इच्छुक उमेदवार तयारी करू लागला आहे. सोशल मिडियावर प्रत्येक विद्यमान लोकप्रतिनिधी, विरोधक, इच्छुक उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियाचा पुरेपुर वापर करायला सुरू केले आहे. ( Raigad LokSabha Election )

संबंधित बातम्या 

आमचाच नेता येणार, तुमचा हरणार… या मतदार संघाचा भावी खासदार कोण असेल याचा एक्झीट पोल घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होतो. यामध्ये ज्या गटाचा कार्यकर्ते हा एक्झीट पोल घेतो, त्या गटाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला पसंती देतात, त्यामुळे हा एक्झीट पोल देखील बोलाचीच कढी बोलाचाच भात ठरू लागली आहे. निवडणूका जशा जवळ येथील तसे तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचे महत्व देखील वाढु लागले आहे. नेते, नेत्याची मुले, नातेवाईक युवा नेते वाढदिवस क्रिकेटच्या मॅचीला हजेरी लावीत आहेत.

त्यामुळे गावात कार्यकर्त्यांच्या मागे किती लोक जमा आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीत कितीजण राहणार हा चिंतनाचा विषय तरी देखील या सर्व कार्यक्रमाचा फार्स सोशल मीडियावर आहे. या निवडणुका डोळयासमोर ठेवून सामाजिक बांधिलकीची समाज उपयोगी कामे देखील मोठया प्रमाणात होत असल्याचे सोशल मीडियावर अनेक ग्रुपवर पहायला मिळत आहे. प्रत्येक गट पक्षाचा कार्यकर्ता आपल्या नेत्याच्या कार्याचा किंवा समारंभाची माहिती सोशल मीडियावर टाकतो. त्याला समर्थक उतर देणारी पोल विरोधी गटाचा पक्षाचा कार्यकर्ता टाकत असतो, त्यामुळे निवडणुकीपुर्वीच सोशल मीडियावर निवडणुकीसाठी सर्वत्र रणांगण तापत असल्याचे दिसत आहे. निवडणूकीचा निकाल फिरवणे तरुणांच्या हातात आहे.

नेत्यांकडून विविध ग्रुपचा वापर

लोकसभेच्या निवडणुक रिंगणात उतरणा-या नेत्यांनी देखील सोशल मीडियावर ग्रुप चालवणा-या कार्यकत्यार्ंना चांगले बळ दिले असल्याची चर्चा असुन लोकसभा अजुन काही दिवसांवर ठेपल्या आहेत मात्र रान सोशल मीडियावर तापून लागले आहे. ( Raigad LokSabha Election )

SCROLL FOR NEXT