Latest

Rahul Gandhi: ‘काँग्रेसच्या क्रांतीकारी जाहीरनाम्याला पंतप्रधान मोदी घाबरले’, राहुल गांधींचा सामाजिक न्याय संमेलनात निशाणा

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  काँग्रेसच्या क्रांतीकारी जाहीरनाम्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत, असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला. बुधवारी (२४ एप्रिल) नवी दिल्लीत काँग्रेस पक्षातर्फे आयोजित सामाजिक न्याय संमेलनात ते बोलत होते. या संमेलनासाठी राहुल गांधींसह महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

दिल्लीत काँग्रेस पक्षाकडून आयोजित सामा-जिक न्याय संमेलनाला राहुल गांधींनी संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना म्हणले आहे की, "काँग्रेसच्या क्रांतीकारी जाहीरनाम्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरलेले तुम्ही पाहिले असेल?" त्यासोबतच देशातील जातीय जनगणनेच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधींनी घोषणा केली की, "जात जनगणना हे माझ्यासाठी राजकारण नाही, ते माझ्या जीवनाचे ध्येय आहे आणि मी ते सोडणार नाही. कोणतीही शक्ती जात जनगणना रोखू शकत नाही. काँग्रेसचे सरकार येताच प्रथम जात जनगणना करू. ही माझी गॅरंटी आहे."

"केंद्र सरकारने मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी म्हणून दिलेल्या १६ लाख कोटी रुपयांचा काही भाग परत मिळवून 90 टक्के भारतीयांना दिलासा देण्याचे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे उद्दिष्ट आहे," अशी घोषणाही राहुल गांधींनी यावेळी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT