Latest

नवीन संसद भवनचे उद्‍घाटन राष्‍ट्रपतींच्‍या हस्‍ते व्‍हावे : राहुल गांधींचे सरकारला आवाहन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नवीन संसद भवनाचे उद्‍घाटन पंतप्रधानांच्‍या हस्‍ते नाही तर राष्ट्रपतींनी करावे, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ( दि. २१) केले. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. याला काँग्रेससह विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांनी आक्षेप घेतला आहे.

पंतप्रधान मोदींच्‍या हस्‍ते उद्‍घाटनाला विरोधी पक्षनेत्यांनी घेतला आक्षेप

पंतप्रधान मोदी हे विधिमंडळाचे प्रमुख नाहीत. ते सरकारचे प्रमुख आहेत, असे स्‍पष्‍ट करत अनेक विरोधी पक्षांच्‍या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्‍या हस्‍ते नवीन संसद भवनाच्‍या उद्‍घाटनावर आक्षेप व्यक्त केला आहे. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष नवीन संसद भवनाचे उद्‍घाटन का करत नाहीत, असा सवाल AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

नवीन संसद भवन हे जनतेच्या पैशाने बांधले गेले आहे, नवीन संसद भवनाचे उद्‍घाटन लोकसभा अध्‍यक्ष किंवा राज्‍यसभा सभापती यांच्‍याकडून होऊ शकले असते, असे ओवेसी यांनी म्‍हटले आहे. दरम्‍यान, लोकसभा सचिवालयाच्या सूत्रांनी म्‍हटलं आहे की, लोकसभा अध्‍यक्ष अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांना नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT