Latest

Rahul Gandhi: राहुल गांधींचा अमेरिकेत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, म्हणाले…

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : जर तुम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवा शेजारी बसवले, तर ते देवाला देखील हे विश्व कसे कार्य करते? हे समजावून सांगतील, अशी बाेचरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली. कॅलिफोर्निया विद्यापीठात येथील भारतीय विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्‍यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते येथील तीन शहरांत भेटी देणार आहेत. यामधील सॅन फ्रान्सिस्को येथे ते पोहोचले असून, त्यांनी येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील इंडियन डायस्फोरा समुदायाशी संवाद साधला आहे.  ते म्हणाले, 'मला वाटतं, तुम्ही मोदीजींना देवाशेजारी बसवलं तर, ते देवाला हे विश्व कसं चालतं हे समजावून सांगायला सुरुवात करतील. त्यामुळे मग मी काय निर्माण केलं याबद्दल देव देखील गोंधळून जाईल'.  (Rahul Gandhi)

आज ज्याप्रकारे भारतातील मुस्लिम समुदायावर हल्ले होत आहेत, अन् यानंतर त्यांच्या ज्या भावना होतात. असेच हल्ले उद्या शीख, ख्रिश्चन, दलित, आदिवासींना देखील होतील. त्‍यावेळी त्यांची भावना देखील अशीच असेल, याची मी खात्री देतो. आज भारतात जे मुस्लिम समुदायासोबत होत होते, तेच यापूर्वी १९८० च्या दशकात दलितांसोबत होत होते, असा आराेपही त्‍यांनी यावेळी केला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT