Latest

Rahul Gandhi Nomination: राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि.३) रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि रॉबर्ट वधेरा हेही उपस्थित होते. रायबरेलीमधून भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रायबरेलीत आता राहुल गांधी विरूद्ध दिनेश प्रताप सिंह अशी लढत होणार आहे. (Rahul Gandhi Nomination)

राहुल गांधी यांच्या आई श्रीमती सोनिया गांधी या १९९९ पासून संसदेत या जागेचे प्रतिनिधित्व करत आहेत, तथापि, त्यांनी प्रकृतीचे कारण सांगून सध्याची लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. रायबरेलीमध्ये श्री. राहुल गांधी यांचा सामना भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दिनेश प्रताप सिंग यांच्याशी होणार आहे, ज्यांनी देखील आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Rahul Gandhi Nomination)

सोनिया गांधी यांनी  2004 ते 2024 या काळात रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, आता त्या राज्यसभेवर निवडून आल्या आहेत. रायबरेली हा राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. अमेठी आणि रायबरेली हे गांधी-नेहरू घराण्याचे पारंपारिक क्षेत्र मानले जातात कारण या कुटुंबातील सदस्यांनी अनेक दशकांपासून या जागांचे प्रतिनिधित्व केले आहे. उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि रायबरेलीच्या जागा काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.(Rahul Gandhi Nomination)

हरियाणातील गुडगावमधून अभिनेते राज बब्बर यांना उमेदवारी

काँग्रेस नेते राज बब्बर यांनी गुडगाव (हरियाणा) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  हरियाणात 25 मे रोजी लोकसभेच्या सर्व 10 जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपने या मतदारसंघातून राव इंद्रजित सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

SCROLL FOR NEXT