Latest

राहुल गांधींची सोलापूर, अमरावतीत आज प्रचारसभा

अनुराधा कोरवी

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी बुधवारी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या राज्यात दोन सभा होणार आहेत. अमरावतीत बळवंत वानखेडे आणि सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी प्रचारसभा घेणार आहेत.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील भारत जोडो मैदान येथे सकाळी 11 वाजता आणि त्यानंतर सोलापुरातील एक्झिबिशन ग्राऊंड येथे दुपारी 3.55 वाजता या सभा होत आहेत. अमरावतीच्या सभेला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, जयश्री वानखडे, माजी खासदार अनंत गुढे, यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.

सोलापूर येथील सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व थोरात यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व लोकसभेच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे, कम्युनिस्ट नेते माजी आ. नरसय्या आडम, दिलीप माने, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

SCROLL FOR NEXT