Latest

IND vs PAK : टीम इंडियासाठी गुड न्यूज; राहुल द्रविड यांची कोरोनावर मात, लवकरच…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया आज (28 ऑगस्ट) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आशिया कप 2022 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या शानदार सामन्यापूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कोरोना संसर्गावर मात करून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघात सामील झाले आहेत असे समजते. 23 ऑगस्ट रोजी टीम इंडिया यूएईला रवाना झाली तेव्हा राहुल द्रविड भारतीय संघाचा भाग नव्हते. द्रविड यांना 21 रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. हा भारतासाठी मोठा धक्का आहे. मुख्य प्रशिक्षकाला संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) व्हीव्हीएस लक्ष्मण यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. पण आता राहुल द्रविड हे कोरोनामुक्त झाल्यानंटर संघाशी जोडले जाणार आहेत, त्यामुळे लक्ष्मण मायदेशी परतणार असल्याचे समजते.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, राहुल द्रविड शनिवारी 27 ऑगस्ट रोजी यूएईला पोहोचतील अशी अपेक्षा होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान द्रविड भारतीय ड्रेसिंग रुममध्ये दिसतील. तर अंतरिम प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण घरी जातील, अशी शक्यता आहे. एका सूत्राने क्रिकबझला असेही सांगितले की लक्ष्मण केवळ शनिवारीच भारतात येणार आहे आणि पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ते भारतीय संघाचा भाग असणार नाही.

23 ऑगस्ट रोजी द्रविड कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. 'टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आशिया कप 2022 साठी यूएईला जाण्यापूर्वी नियमित चाचण्या घेण्यात आल्या असून ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. द्रविड बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत आणि त्यांना सौम्य लक्षणे आहेत. COVID-19 चा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते टीममध्ये सामील होतील. भारतीय संघ 23 ऑगस्ट 2022 रोजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाईल', असे त्यांनी ट्विटरवरून सांगितले होते.

2022 च्या आशिया चषकापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर द्रविडला विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रशिक्षकाची भूमिका निभावली. द्रविडला संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर, बीसीसीआयने लक्ष्मणला अंतरिम प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेहून दुबईला पाठवले जेथे टीम इंडियाने त्याच्या देखरेखीखाली सराव सत्रे आयोजित केली.

2022 च्या आशिया चषकापूर्वी झिम्बाब्वे दौऱ्यावर प्रशिक्षक द्रविड यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांना झिम्बाब्वेहून दुबईला पाठवले जेथे टीम इंडियाने त्याच्या देखरेखीखाली सराव सत्रे आयोजित केली. व्हीव्हीएस लक्ष्मण उपकर्णधार केएल राहुल, दीपक हुडा, दीपक चहर आणि आवेश खान यांच्यासह झिम्बाब्वेहून यूएईला पोहोचले होते. द्रविड यांना बरे होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल असे सुरुवातीला सांगण्यात आले होते. त्यामुळे अंतरिम प्रशिक्षकाची तरतूद करण्यात आली होती. मात्र, आता द्रविड यांनी कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते टीम पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाशी जोडले जातील.

SCROLL FOR NEXT