Latest

Justin Bieber : पॉप स्टार जस्टिन बीबरने दिली गुड न्यूज, लग्नाच्या ६ वर्षांनंतर घरी हलणार पाळणा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॉप स्टार जस्टिन बीबर आणि पत्नी हेली बीबर लवकरचं पॅरेंट्स बनणार आहेत. या कपलने सोशल मीडियावर फॅन्सना गूड न्यूज दिलीय. (Justin Bieber) जस्टिन बीबरने सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हेली बीबर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. फॅन्स जस्टिन बीबर आणि हेली बीबरचे अभिनंदन करत दोघांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Justin Bieber)

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये Hailey Bieber वेडिंग गाऊनमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. बीबरचा हा मॅटरनिटी फोटोशूट खूप खास आहे. कारण फोटोग्राफर पती Justin Bieber बनला होता.

२०१८ मध्ये केले होते लग्न

जस्टिन बीबरने हेली बीबरशी २०१८ मध्ये लग्न केले होते. आता ६ वर्षांनंतर ती पहिल्यांदा पालक होण्यासाठी उत्साही आहेत. हेली बीबर एक अमेरिकन मॉडल आहे. दोघांनी जुलै २०१८ मध्ये बहामासमध्ये साखरपुडा केला होता. आणि मग दोन महिन्यांनी न्यू यॉर्क सिटी कोर्ट हाऊसमध्ये विवाहबंधनात अडकले.

२००६ मध्ये झाली होती पहिली भेट

जस्टिन बीबर – हेली बीबरची पहिली भेट २००६ मध्ये झाली होती. त्यावेळी जस्टिन बीबर सेलेना गोमेजला डेट करत होता. सेलेनाशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने हेलीला डेट करणे सुरू केले होते. २०१६ मध्ये त्यांचाही ब्रेकअप झाला. २०१८ मध्ये ते पुन्हा एकत्र आले आणि लग्नाच्या बंधनात अडकले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT