Latest

Ishan Kishan : ईशान किशनला तिसऱ्या वनडेत का स्थान मिळाले नाही? रोहितने सांगितलं कारण…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ishan Kishan : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. याआधी झालेले दोन सामने भारताने जिंकले असून मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी मिळवली आहे. आजचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बरेच बदल केले आहेत. गेल्या सामन्याच्या तुलनेत भारतीय संघाची आजची प्लेईंग इलेव्हन खूपच वेगळी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारताने उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या रविचंद्रन अश्विन आणि इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही.

ईशान किशन आजारी? (Ishan Kishan)

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने गेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 बळी घेतले होते. त्याने ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गजांना बाद करून विश्वचषकासाठी आपला दावा पक्का केला होता. याशिवाय अश्विनने पहिल्या सामन्यात 1 विकेटही आपल्या नावावर केली होती. त्याचबरोबर इशान किशनही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र त्याला बुधवारच्या सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. रोहित शर्माने याबाबत खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, 'इशान (Ishan Kishan) आजारी आहे. त्याला व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळेच प्लेइंग इलेव्हनमधून या डावखु-या फलंदाजाला वगळण्यात आले आहे.'

वॉशिंग्टन सुंदरला संधी का मिळाली?

आजच्या सामन्यात अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी कोणाला विश्वचषकात संधी मिळणार यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन सामन्यांत आर अश्विनला संधी मिळाली. पण तिस-या सामन्ययत अश्विन ऐवजी सुंदरची निवड करण्यात आली आहे. पण हा बदल का करण्यात आला असा सावाल चाहते सोशल मीडियातून उपस्थित करत आहेत.

SCROLL FOR NEXT