Latest

नागपूर : भाजप- काँग्रेस पदाधिकाऱ्यांत राडा

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. काल सकाळी ११ वाजताच्या सुमारास झालेला राड्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते बाबूखान आणि त्याच्यासोबत आलेल्या काही महिला व पुरुषांनी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात वाद घातला. तसेच कार्यालयात तोडफोड करत तिथल्या साहित्याची नासधूस केल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी केला आहे.

वीरेंद्र कुकरेजा प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक आहे. समता नगर आणि सुगत नगर परिसरात त्यांचे लक्ष नाही, असा आरोप नागरीक करत आहेत. काँग्रेस कार्यकर्ते बाबू खानच्या नेतृत्त्वात काही लोकांनी कुकरेजा यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केला. तिथे वाद होऊन त्याची परिणीती कुकरेजा यांच्या कार्यालयातील तोडफोड करण्यात झाली. सध्या दोन्ही पक्ष परिसरातील जरीपटका पोलीस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोहोचले आहेत. जरीपटका पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस ठाण्यासमोर दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT