Latest

Pushpa ची रश्मिका आता मुंबईकर होणार!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली आणि सध्या 'पुष्पा'मधील श्रीवल्लीच्या भूमिकेने पुन्हा सर्वांच्या तोंडी नाव असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आता तिचे ड्रीम होम खरेदी केले आहे.

रश्मिकाने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून खुलासा केला होता की, ती सध्या खूप व्यग्र आहे. कारण, ती घराचे सामान पॅक करत आहे. त्यामुळे चाहत्यांनी अंदाज लावला की, रश्मिका नव्या घरात शिफ्ट होत आहे.

गतवर्षीच रश्मिकाने मुंबईत एक लक्झरियस हाऊस खरेदी केले होते. रश्मिकाने बॉलीवूडमध्ये दोन चित्रपट स्वीकारले आहेत. 'मिशन मजनू' आणि 'गूडबाय'. त्यामुळे तिला वारंवार मुंबईला यावे लागते आणि प्रत्येक वेळी तिला हॉटेलमध्ये राहावे लागायचे. त्यामुळे तिने ठरवून मुंबईत घर घेतले होते.

आता रश्मिका ज्या अर्थी सामानाची आवराआवर करत आहे त्याअर्थी ती मुंबईला शिफ्ट होतेय, असा अंदाज लावला जात आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावरून संपूर्ण घर चाहत्यांना दाखवले होते. रश्मिका आता मुंबईकर होणार असेल तर आनंदच आहे.

SCROLL FOR NEXT