सांगली; पुढारी वृत्तसेवा : फेब्रुवारीमध्ये परीक्षांचा हंगाम सुरू होतो. दहावी, बारावी व नंतर शालांत परीक्षा! स्पर्धेच्या या युगात परीक्षेचं टेन्शन केवळ विद्यार्थ्यांना नाही तर पालकांनाही असते. या काळात मुलांच्या मनावर असणारा ताण, अपेक्षांचे ओझे, अवघड वाटणार्या विषयांचे टेन्शन यामुळे ऐन परीक्षांमध्ये मुलांची तब्येत बिघडते. पालकांची चिडचिड वाढते. याचा परिणाम म्हणजे एक्झाम फोबिया, डिप्रेशन आणि टोकाची भूमिका म्हणजे आत्महत्येचे विचार. मात्र या सर्व प्रश्नांवर हमखास उपाय मिळू शकतो… तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे. पुढारी कस्तुरी क्लब व आपलं एफ. एम. 91.9 यांच्यातर्फे परीक्षा काळातील तणाव नियोजन पालक व विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा व मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा रविवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता, रजपूत शैक्षणिक संकुल, रिलायन्स मार्केट समोर, सांगली येथे होणार आहे.
मानसतज्ज्ञ कपिल लळीत हे 'स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर मार्गदर्शन करणार असून पालक विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकाही विचारता येणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9607957576