पुणे : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या दसर्याच्या मुहुर्तावर वाहन खरेदीची लगबग पहायला मिळते. यंदाही अशीच लगबग पहायला मिळाली असून, यंदा तब्बल 5 हजार 517 वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली आहे. दसर्याचा आदल्या दिवशीपर्यंत वाहनांची खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. या आकडेवारीत आणखी वाढ होणार आहे. गेल्यावर्षी वाहन खरेदीवर कोरोनाचे सावट होतं. यंदा मात्र, सद्याची स्थिती पहाता पुणेकरांकडून वाहन खरेदीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडे दसर्याच्या मुहुर्तावर म्हणजेच दिनांक 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2022 दरम्यान खरेदी केलेल्या वाहनांची ही नोंद आहे. त्यानुसार यंदा वाहन खरेदीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे आरटीओला गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा किती महसूल मिळणार हे आता दसर्यानंतरच पहावे लागणार आहे.
दसर्याचा मुहुर्तावर नागरिक नवनवीन वस्तुंची खरेदी करतात. याच मुहुर्तावर पुणेकरांनी गेल्या आठ दिवसांपासून ही वाहन खरेदी करण्याची तयारी केली होती. ही सर्व वाहने पुणेकर दसर्याच्या मुहुर्तावर आपापल्या घरी नेण्याच्या तयारीत आहेत. तसेच, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचारी, अधिकारी वर्गाकडून वाहनांची नोंदणी प्रक्रिया वेळेत पुर्ण होऊन, नागरिकांना वेळेत वाहने मिळावीत, याकरिता मेहनत घेण्यात येत आहे.
दसर्याच्या मुहुर्तावर 2022 मधील वाहनांची खरेदी
अ.क्र.- वाहनप्रकार – खरेदी वाहन संख्या
1) मोटार सायकल – 3490
2) कार – 1556
3) रिक्षा – 151
4) गुडस – 167
5) टॅक्सी – 61
6) बस – 11
7) ट्रॅक्टर – 58
8) रूग्णवाहिका – 02
9) कन्स्ट्रक्शन वाहने – 11
10) डम्पर – 02
11) क्रेन – 03
12) एक्स्यावेटर – 03
13) टोईंग ट्रक – 02
एकूण वाहने : – 5 हजार 517
दसर्याच्या मुहुर्तावर 2021 मधील वाहनांची खरेदी
अ.क्र.- वाहनप्रकार – खरेदी वाहन संख्या
1) मोटार सायकल – 3649
2) कार – 1766
3) रिक्षा – 87
4) गुडस – 264
5) टॅक्सी – 11
6) बस – 05
7) ट्रॅक्टर – 89
8) रूग्णवाहिका – 22
9) कन्स्ट्रक्शन वाहने – 02
10) डम्पर – 02
11) ट्रेलर – 12
एकूण वाहने : – 5 हजार 912