Latest

KKR vs PBKS : कोलकाताला तिसरा धक्का, श्रेयस अय्यर बाद

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क :

कोलकाता नाईट रायडर्सला तिसरा धक्का

श्रेयस अय्यर १५ चेंडूत २६ धावांची आक्रमक खेळी करत तंबूत परतला.

कोलकाता नाईट रायडर्सला दुसरा धक्का

व्यंकटेश अय्यर ७ चेंडूत ३ धावा करत स्वस्तात माघारी परतला.

कोलकाता नाईट रायडर्सला पहिला धक्का

अजिंक्य रहाणे ११ चेंडूत १२ धावा करत तंबूत परतला.

पंजाब किंग्जचे कोलकाता नाईट रायडर्स समोर १३८ धावांचे आव्हान

पंजाब किंग्जने कोलकाता समोर १३८ धावांचे आव्हान ठेवले आहे. भानुका राजपक्षेने शिवम मावीला सलग तीन षटकार लगावत चांगली सुरूवात करून दिली. भानुका राजपक्षेने ९ चेंडूंमध्ये १३१ धावांची आक्रमक खेळी केली. पंजाब किंग्ज कडून  शिखऱ धवनने १५ चेंडूत १६, तर कगिसो रबाडाने १६ चेंडूमध्ये २५ धावांची खेळी केली. २० षटकांअखेर पंजाब किंग्जचा संघ सर्वबाद १३७ धावांपर्यंत मजल मारू शकला.

कोलकात नाईट रायडर्स कडून उमेश यादव ४ षटकांत २३ धावा देत ४ विकेट्स पटकावल्या. तर सुनील नारायण, वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक विकेट पटकावली. उमेश यादवने केलेल्या अचूक माऱ्यासमोर पंजाब किंग्जच्या संघाने नांगी टाकली.

पंजाब किंग्जला आठवा धक्का

राहुल चहर भोपळाही न फोडता तंबूत परतला.

पंजाब किंग्जला सातवा धक्का

हरप्रित ब्रार १८ चेंडूत १४ धावांची खेळी करत तंबूत परतला.

पंजाब किंग्जला सहावा धक्का

शारूख खान भोपळाही न फोडता माघारी परतला.

पंजाब किंग्जला पाचवा धक्का

राज बावा १३ चेंडूमध्ये ११ धावा करत तंबूत परतला. सुनील नारायणने राज बावाला बोल्ड केले.

पंजाब किंग्जला चौथा धक्का

लियम लिंग्वींस्टन १६ चेंडूंत १९ धावा करत तंबूत परतला.

पंजाब किंग्जला तिसरा धक्का

शिखर धवन १५ चेंडूत १६ धावांची खेळी करत तंबूत परतला.

पंजाब किंग्जला दुसरा धक्का

भानुका राजपक्षे ८ चेंडूंमध्ये ३१ धावांची दमदार खेळी करत तंबूत परतला. शिवम मावीला सलग ३ षटकार लावत राजपक्षेने जोरदार फटकेबाजी केली.

पंजाब किंग्जला पहिला धक्का

मयांक अग्रवाल ५ चेंडूंमध्ये १ धाव करत स्वस्तात माघारी परतला आहे. उमेश यादवने पहिल्याच षटकात मयांक अग्रवालला  एलबीडब्ल्यू बाद केले आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या हंगामातील आठवा सामना आज खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आमनेसामने असतील. केकेआरने टॉस जिंकला असून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब आणि केकेआर २९ वेळा आमने सामने आले आहेत. त्यात केकेआरने १९ वेळा बाजी मारली आहे.

पंजाबचा हा हंगामातील दुसरा आणि कोलकात्याचा तिसरा सामना असेल. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील किंग्स दुसरा सामना खेळण्यासाठी त्यांचा विजयी रथ सुरू ठेवतील, तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरला विजयी मार्गावर परत यायचे आहे. अशा स्थितीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT