Latest

पुणेकर शास्त्रज्ञाचे पेलोड; सूर्याच्या अभ्यासात ‘आयसर’चा महत्त्वाचा सहभाग

अमृता चौगुले

पुणे : शहरातील पाषाण भागात भारतीय विज्ञान संस्थेत (आयसर) कार्यरत असलेले शास्त्रज्ञ प्रा. भास बापट यांनी तयार केलेले 13 किलो वजनाचे पेलोड (संशोधनासाठीचे यांत्रिक उपकरण) आदित्य यानात पाठविण्यात आले आहे. याव्दारे सूर्यावरच्या विद्युत-चुंबकीय लहरी सौर वार्‍यांचा उगम व त्यातील प्रोटॉन व अल्फा किरणांचा अभ्यास केला जाणार आहे. प्रा. बापट यांनी दहा वर्षे यावर संशोधन केले आहे.

इस्रोने नुकतेच सूर्याच्या दिशेने पाठविलेल्या 'आदित्य एल-1' या यानात पुण्यातील आयसर व आयुका या दोन संस्थांतील शास्त्रज्ञांचा मोठा सहभाग आहे. यात आयसरमध्ये कार्यरत असणारे प्रा. भास बापट यांनी तयार केलेले 13 किलो वजनाचे पेलोड सर्वांत कमी वजनाचे असून, ते सर्वांत महत्त्वाचे संशोधन करणार आहे.

यानात आहेत ही सात पेलोड

या यानात दृश्यमान उत्सर्जन रेषा कोरोनग्राफ, सौर अल्ट्रा-व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, सौर कमी-ऊर्जा एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर, उच्च ऊर्जा परिभ्रमण क्ष-किरण स्पेक्ट्रोमीटर, आदित्य सौर पवन कण प्रयोग, आदित्य (पीएपीए) साठी प्लाझ्मा विश्लेषक पॅकेज, मॅग्नेटोमीटर (एमएजी), आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट ही सात पेलोड आहेत. यातील आदित्य सोलर विंड पार्टिकल हे पेलोड प्रा. बापट यांनी तयार केलेले असून, ते सूर्यावरील वार्‍याचा उगम, त्यातील प्रोटॉन व अल्फा किरणांचा अभ्यास करणार आहे.

अहमदाबादच्या प्रयोगशाळेत तयार झाले यंत्र

प्रा. भास बापट यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळा अहमदाबाद यांच्या साह्याने हे पेलोड विकसित केले आहे. त्यांनी 2013 मध्ये संशोधनाला सुरुवात केली. त्यांच्या अथक प्रयत्नांनी हे पेलोड 2023 मध्ये सूर्याच्या अभ्यासासाठी तयार झाले आहे.

कोण आहेत प्रा. बापट..?

प्रा. बापट यांचे संशोधनाचे क्षेत्र प्रायोगिक अणु आणि आण्विक भौतिकशास्त्र आहे. या संशोधनामध्ये अणु, आण्विक प्रक्रिया उलगडण्यासाठी चार्ज केलेले कण आणि फोटो शोधणे, हे समाविष्ट आहे. त्यांच्या पूर्वीच्या संशोधनातून उदयास आलेल्या इन्स्ट्रुमेंटेशनमधील कौशल्यामुळे या उपकरणाचा विकास शक्य झाला आहे. 2013 मध्ये या उपकरणाचा प्रथम विचार करण्यात आला होता आणि 'आदित्य-एल-1' मिशनसाठी इस्रोकडे प्रस्तावित करण्यात आले. त्यांनी विकसित केलेले पेलोड हे सर्वांत कमी 13 किलो वजनाचे आहे. ते पुणे आयसरमध्ये कार्यरत असून, त्यांनी हे संशोधन अहमदाबादच्या प्रयोगशाळेत केले आहे.2) पेलोड : प्रा. बापट यांनी तयार केलेले हेच ते मॅग्नेटोमीटर. 3) सन इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ह : अशा प्रकारे सूर्यावर सौर वारे अन् वादळे तयार होतात. त्यातील प्रोटॉन व अल्फा किरणांचा अभ्यास केला जाणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT