Latest

Pune university : मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण : पुणे विद्यापीठात दोन गट भिडले; कार्यकर्त्यामध्यें राडा

अमृता चौगुले

पुढारी ओनलाईन डेस्क : पुणे विद्यापीठात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण केल्याने भाजप युवा मोर्चा आणि एसएफआय या दोन संघटना एकमेकांच्या विरोधात भिडले आहेत. दोन गटांमध्ये बाचाबाचीदेखील झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामुळे भाजपकडून आज आंदोलन सुरु होतं. दरम्यान आंदोलनावेळी दोन गटात गोंधळ झाला आहे. या घटनेमुळे पुणे विद्यापीठात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पुणे विद्यापीठात नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे भाजप आणि एसएफआयचे कार्यकर्ते आज आमने-सामने आले. कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. डाव्या संघटनांचा लाल झेंडा पायाखाली तुडवून भाजप युवा मोर्चाकडून निषेध व्यक्त केला. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर डाव्या संघटनांकडूनही इंकलाब जिंदा बाद च्या घोषणा देण्यात आल्या.

काय आहे नेमकं प्रकरण?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक तारखेला दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेनंतर पुन्हा काल रात्री विद्यापीठातील आठ नंबर होस्टेलमधील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केलं होत. या लिखाणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. संबधित आक्षेपार्ह मजकूर कोणी लिहिला याचा शोध विद्यापीठाकडून सुरु होते. दरम्यान मोदी यांच्याबद्दल मजकूर लिहिल्याने पुणे भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT