Latest

पॉर्न व्हिडीओ दाखवून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार

अमृता चौगुले

पुणे: पुढारी वृत्तसेवा

पॉर्न व्हिडीओ दाखवून पत्नीचा छळ करत तिच्या मनाविरूध्द नैसर्गिक अत्याचार करणार्‍या आणि आपल्या पोटच्या मुलीसमोर स्वतःची कपडे काढून अश्लिल वर्तन करणर्‍या एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. हा प्रकार 2009 पासून सुरू होता. याबाबत पिडीत पत्नीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

कोंढवा परिसरात एक दाम्पत्य राहण्यास आहे. त्यांना चारही मुली आहेत. मुलगा व्हावा यासाठी आरोपी पतीचा अट्टाहास होता. त्याचपोटी तो पत्नीच्या मनाविरूध्द पॉर्न व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक अत्याचार करत होता. आपण काय करतो याचेही भान त्याला नव्हते. आपल्या पोटच्या मुलीसमोरच तो कपडे काढून अश्लिल वर्तन करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. त्याला चारही मुलीच असल्याने पत्नीला मारहाण करत होता. कोणतीही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया न करता पत्नीचा नाहक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT