Latest

पुण्यात रस्त्यावर थुंकणं महागात पडलं! महापालिकेने थुंकणाऱ्याला सफाई करायला लावत घडवली चांगलीच अद्दल

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: आपल्याकडे रस्त्यांवर लोक कसलाही विचार न करता थुंकत असतात. परंतु,आता रस्त्यांवर थुंकणं हे पुण्यातील काही जणांना महागात पडलं आहे. शहरातील रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना पुणे महापालिकेने आणि पोलिसांनी रस्ता सफाई करायला लावत चांगलीच अद्दल घडवली. तर महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांकडून 3 दिवसात तब्बल 1 लाख 23 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे शहरात जी -20 च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छता केली जात आहे. मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात थुंकणाऱ्यांवर आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जात आहे.

रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना लोकांना पुणे महापालिकेने आणि पोलिसांनी रस्ते सफाई करायला लावत अद्दल घडवली. या लोकांना भररस्त्यात थुंकलेली घाण साफ करायला लावली. याचा व्हिडीओ पुणे महापालिकेने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. महापालिकेने या व्हिडीओवर पुणे पोलिसांनी देखील कमेंट् केली आहे. जी-20 च्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात स्वच्छता आणि सुशोभिकरणाचं काम जोरात सुरु आहे. पुणे विमानतळ ते सेनापती बापट रोड दरम्यान असलेला परिसर एकदम चकाचक करण्यात आला आहे. या परिसरात स्वच्छता सुरु असतानाच दुसरीकडे बेजबाबदार पुणेकर मात्र रस्त्यांवर थुंकताना आणि घाण करताना दिसत आहेत. त्यांना महापालिकेने चांगलीच अद्दल घडवण्याचं ठरवलं आहे.

महापालिकेडून गेल्या दहा दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 23 जणांवर कारवाई केली आहे. 23 हजारांचा दंड त्यांच्याकडून वसूल केला आहे. तर शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या 422 जणांकडून 1 लाख 46 हजार 420 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या लोकांकडून 2 हजार 600 रुपये एवढा दंड वसूल केला आहे. याबरोबरच 17 ठिकाणी कचरा जाळणाऱ्यांकडून 9 हजार 500 आणि वर्गीकरण न करता कचरा दिल्याबद्दल 30 जणांकडून 3 हजार 760 रुपये दंड वसूल केला आहे.

SCROLL FOR NEXT