Latest

लघुशंकेसाठी थांबलेल्या बांधकाम व्यावसायिकाला महाळुंगे येथे लुटले

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

लघुशंकेसाठी थांबलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाला तीन जणांनी मिळून लुटले. ही घटना सोमवारी 30 मे रोजी दुपारी चाकण जवळील महाळुंगे गावच्या हद्दीत घडली.

शुभम साहेबराव कड (24, रा. राजतारा निवास, शिक्रापूर रोड, चाकण) यांनी मंगळवारी ३१ मे रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कड हे बांधकाम व्यावसायिक आहेत. सध्या त्यांची खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात बांधकाम साईट चालू आहे. या साइटवर भेट देऊन पुन्हा आपल्या घरी चालले होते. ते महाळुंगे गावच्या हद्दीत एका कंपनीच्या कंपाऊंड गेट जवळ ते लघुशंका करण्यासाठी थांबले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी फिर्यादी कड यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील घड्याळ व मनगटात असलेले चार तोळ्याचे सोन्याचा दागिना असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

https://youtu.be/YepUS0JEz38

SCROLL FOR NEXT