Latest

ठरलं तर ! पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणारच ; न्यायालयाचे निर्देश

अमृता चौगुले

पुणे ऑनलाईन : खासदार गिरीश बापट यांच्या निधानानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी निवडणुका घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यादरम्यान बापट यांच्या निधनानंतर गेले 10 महीने ही जागा रिक्त का ठेवली गेली अशी विचारणाही यावेळी कोर्टाने केली. या दरम्यान अन्य राज्यातील निवडणुका आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकांची तयारी करण्यात प्राथमिकता असल्याने पुण्यात लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली गेली नाही असा दावा आयोगाने केला. त्यावर पुण्यात माणिपूरसारखी अशांत परिस्थिती होती का ? तसे नसल्यास आयोगाचा हा दावा वैध ठरवला जाऊ शकत नाही असे यावेळी न्यायमूर्ती पटेल आणि न्यायमूर्ती खाता यांच्या खंडपीठाने आयोगाकडे केली. पोटनिवडणूक न घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची कृती बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा दावा करणारी जनहित याचिका पुण्यातील सुघोष जोशी यांनी दाखल केली होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT