Latest

डिजिटल सातबारा डाऊनलोडमध्ये पुणे आघाडीवर तर अहमदनगर दुसऱ्या स्थानी

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: नागरिक तसेच शेतकरी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सातबाऱ्याला आता चांगलीच मागणी वाढलेली आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन डिजिटल सातबारा घेण्यात पुणे जिल्ह्याने आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या तीन वर्षांत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील नागरिकांनी 36 लाख 58 हजार साताबारे डाऊनलोड केल्याची बाब समोर आली आहे.

कोणत्याही बँकेचे कर्ज काढणे, शासकीय काम अथवा इतर खासगी कामांसाठी मालमत्तेचा पुरावा म्हणून सातबारा उताऱ्यास खूप महत्त्व आहे. त्यासाठी महसूल विभागाने गेल्या सात ते आठ वर्षांपासून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा ऑनलाइन सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज उरली नाही. त्यामुळे आता सर्व साताबारा काढण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार हा डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यामध्ये पुणे जिल्ह्याने पुन्हा आघाडी घेतली आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत 36 लाख 58 हजार नागरिकांनी सातबारा डाऊनलोड केले असून, सातबारा डाऊनलोड करण्यात पुणे जिल्हा पहिल्या स्थानी आहे, तर अहमदनगर जिल्हा द्वितीय, सोलापूर जिल्हा तृतीय स्थानी आहे.

संपूर्ण राज्यात गेल्या तीन वर्षांत 3 कोटी 26 लाख डिजिटल सातबारा डाऊनलोड झाले आहेत. त्यातून राज्याला 49 कोटींचा महसूल मिळाला. तर डिजिटल स्वाक्षरी मिळकत पत्रिका डाऊनलोडमध्ये कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून आतापर्यंत 2 लाख 80 हजार मिळकतपत्रिका जिल्ह्यातील नागरिकांनी डाऊनलोड केल्या आहेत. मुंबई उपनगर जिल्हा द्वितीय, तर नागपूर जिल्हा तृतीय स्थानी आहे. संपूर्ण राज्यात गेल्या दोन वर्षांत 20 लाख 58 हजार डिजिटल स्वाक्षरीत मिळकतपत्रिका डाऊनलोड झाल्या. त्यातून 18 कोटी 85 लाखांचा महसूल मिळाला आहे. या साताबारा डाऊनलोडसाठी महसूल विभागाचे 'महाभूमी' पोर्टल सर्वोत्तम ठरत आहे.

साताबारा डाऊनलोडमुळे महसूल विभागाचे महाभूमी ई-सेवा पोर्टल सर्वोत्तम ठरत आहे. त्यानुसार आपले जमिनीचे संपूर्ण कायदेशीर वैध अधिकार अभिलेख म्हणजेच 7/12 व मिळकत पत्रिका ऑनलाईन मिळविण्यासाठी महाभूमी पोर्टलला लॉगिन करावे, असे आवाहन करतो.
– रामदा जगताप, ई-पोर्टलचे तत्कालीन राज्य समन्वयक रामदास जगताप

SCROLL FOR NEXT