Latest

food delivery man : पुण्यात फूड डिलिव्हरी बॉयने घेतला तरुणीचा किस, अटकेनंतर जामिनावर सुटका

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका नामांकित कंपनीच्या फूड डिलिव्हरी बॉयने तरूणीचा किस घेतल्याने पुण्यात खळबळ माजली होती. डिलिव्हरी बॉयच्या या वर्तनामुळे कोंढवा पोलीस ठाण्यात या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

या गुन्ह्याप्रकरणी रईस शेख असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास आरोपी जेवणाची ऑर्डर घेऊन तो पीडित मुलीच्या घरी गेला होता. मुलीने जेवणाची ऑर्डर घेतल्यानंतर रईसने संबंधित तरूणीकडे पाणी मागितले. पाणी पिऊन झाल्यानंतर त्याचे आभार मानण्यासाठी संशयिताने मुलीचा हात धरला आणि तिला जवळ ओढले. त्यानंतर दोनवेळा तिच्या गालाचा किस घेतला, असा आरोप संबंधित तरूणीने केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT