Latest

पुणे शहराचा पारा 12.5 अंशांवर

अमृता चौगुले

पुणे : शहराच्या किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, रविवारी शहराचे किमान तापमान 12.5 अंशांवर आले होते. आगामी तीन दिवसांत यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिनाभर शहराच्या किमान तापमानात मोठी वाढ होऊन ते 15 ते 19 अंशांवर गेले होते. त्यामुळे हिवाळ्यातही खूप उकाडा जाणवत होता. मात्र, आता जानेवारीत किमान तापमानात घट होण्याचे संकेत आहेत.

SCROLL FOR NEXT