Latest

आजचे राशिभविष्य (दि. २३ ऑगस्ट २०२३)

Arun Patil

आजचे राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकता. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो, हे विसरून चालणार नाही.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत, तर वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल. त्यामुळे वैतागून जाल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे; पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : मानसिक स्पष्टता टिकविण्यासाठी संभ्रम आणि नैराशेपासून दूर राहा. भूतकाळातील गुंतवणुकीतून आमदनी वाढणे द़ृष्टीपथात येईल.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल, असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत, तर अतिरिक्त पैसा कमावू शकाल.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : संयम, निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे हमखास यशप्राप्ती होणार आहे. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : जे लोक लघू उद्योग करतात. त्यांना आजच्या दिवशी जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते भविष्याची दिशा दाखवतील. मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल, तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT