Latest

लॅटिन अमेरिका : नवीन आर्थिक शक्ती!

Arun Patil

लॅटिन अमेरिकेत दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील 33 देशांचा समावेश होतो. लॅटिन अमेरिकेकडे जगातील निम्मे लिथियम, 35 टक्के तांबे आणि चांदी तसेच ग्राफाईट, टिन, निकेल याचा विपुल साठा आहे. एवढेच नाही तर चिलीमध्ये लिथियमसारखा महत्त्वाचा धातू वाळूच्या बाष्पीभवनातून बाहेर काढला जातो. जगातील एकूण सोयाबीनच्या निर्यातीत लॅटिन अमेरिकेचा वाटा 60 टक्के आहे. या दुर्लक्षित आणि भविष्यात उदयास येणार्‍या आर्थिक शक्तीविषयी…

लॅटिन अमेरिकेत दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील 33 देशांचा समावेश होतो. लॅटिन हे नाव सर्वप्रथम फ्रान्सचे सर्वेसर्वा नेपोलियन तृतीय यांनी 19 व्या शतकात केले. अनेक शतकांपासून या भागाने जगभरात लाखमोलांच्या वस्तू, खनिज पदार्थ पुरविण्याचे काम केले. उदाहरणादाखल अर्जेंटिना हे नाव नाव चांदी धातू आधारित आहे. चांदीला लॅटिन भाषेत अर्जेंटम म्हटले जाते. ब—ाझीलचे नाव या ठिकाणच्या बि—झलवूड झाडावरून पडलेले आहे. युरोपच्या व्यापार्‍यांनी 16 व्या शतकात या ठिकाणी बि—झलवूड झाडांची खूप कत्तल केली. अर्थात लॅटिन अमेरिकेत राजकीय स्थिरता कधीच राहिलेली नाही. या ठिकाणी सतत सत्तापालट, लोकप्रिय सरकार कोसळणे, गुन्हेगारी आणि भ—ष्टाचार यांसारख्या समस्या नेहमीच दिसल्या आहेत. मात्र त्यावर कधी ना कधी आळा बसेल, अशी शक्यता कायमच वर्तविली गेली आहे.
जागतिक साठ्याच्या रूपातून लॅटिनच्या 33 देशांवर सर्वांचीच नजर राहिलेली आहे. पॅरिसची स्वायत्त आणि सरकारअंतर्गत असणारी संघटना आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या मते, 2030 पर्यंत जगात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या एक हजार पटीच्या वेगाने वाढून ती 250 दशलक्ष होईल. लॅटिन देश चिलीच्या एसक्यूएमसाठी ही खूपच महत्त्वाची बातमी आहे. कारण ही कंपनी जगातील प्रमुख लिथियम उत्पादक म्हणून ओळखली जाते. इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीसाठी लिथियम महत्त्वाचे आहे. अटाकामा वाळवंटात ही कंपनी मातीत असलेल्या नैसर्गिक द्रव्यातून लिथियम काढण्याचे काम करते. आजघडीला जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भर दिला जात आहे. या कारणांमुळेच खनिजाला मागणी अचानक वाढली आहे. उदाहरणार्थ साधारण वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना तांब्याची 400 पट अधिक गरज भासते. या शतकाच्या प्रारंभी चीनमध्ये उद्योगधंदे वाढल्यामुळे पोलाद आणि तेलाला प्रचंड मागणी वाढली. मात्र काही वर्षांतच त्यात घट होऊ लागली. दुसरीकडे धातू आणि खनिजाला प्रत्येक देशात मागणी राहणार असून ती अधिक शाश्वत आहे.
एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सने 2022 मध्ये एक अंदाज व्यक्त केला आणि त्यानुसार 2035 पर्यंत जगभरातील तांब्याची मागणी 25 दशलक्ष टनवरून ती दुप्पट होत 50 दशलक्ष टनावर पोचेल. लॅटिन अमेरिकेच्या बहुतांश देशांना मिळणारा महसूल हा निर्यातीतून मिळतो. त्याचे प्रमाणही सुमारे 80 टक्के आहे. लॅटिन अमेरिकेकडे जगातील निम्मे लिथियम, 35 टक्के तांबे आणि चांदी तसेच ग्राफाईट, टिन, निकेल याचा विपुल साठा आहे. एवढेच नाही तर चिलीमध्ये लिथियमसारखा महत्त्वाचा धातू वाळूच्या बाष्पीभवनातून बाहेर काढला जातो आणि ही प्रक्रिया खूप सोपी आहे. चीन आणि भारतात मात्र उत्खनन करत लिथियम काढणे खूपच किचकट आणि खर्चिक आहे. ब—ाझीलमध्ये चुंबकीय तत्त्व असलेला दुर्मीळ वालुकामय धातू पृष्ठभागावर सहजपणे सापडतो. ब—ाझील आणि चिलीसारख्या देशात स्वस्त आणि हरित ऊर्जा आहे.
2030 पर्यंत स्वस्तात हायड्रोजन उत्पादन करण्यासाठी चिली सध्या दिवस-रात्र मेहनत करत आहे. यातही सोन्याहून पिवळी बाब म्हणजे या भागात तेलाचा मोठा साठा सापडला आहे. एका अंदाजानुसार हा साठा 70 अब्ज बॅरलपेक्षा मोठा मानला जात आहे. 2030 पर्यंत अर्जेंटिना, ब—ाझील, मेक्सिको हे एकत्र आल्यास ते 11 दशलक्ष बॅरल तेल उत्पादित करू शकतात. याप्रमाणे ते सौदीशी मुकाबला करू शकतील. सध्या सौदीत रोज 12 दशलक्ष बॅरलचे उत्पादन होते. सौदी अजूनही जगातील दुसरा मोठा तेल उत्पादक आहे. आता आहाराचा विचार केल्यास 2040 पर्यंत जगातील लोकसंख्या 9.1 अब्ज होऊ शकते. या हिशेबाने खाद्यपदार्थाची मागणीही वाढेल. संयुक्त राष्ट्राच्या एका अंदाजानुसार, जगाची लोकसंख्या 2080 पर्यंत 10 अब्ज 70 कोटी होईल जगातील एकूण सोयाबीनच्या निर्यातीत लॅटिन अमेरिकेचा वाटा 60 टक्के आहे. याशिवाय ते कुक्कुट, साखर, कॉफीसह अनेक गोष्टींची निर्यात करतात. यामागचे कारण म्हणजे कमी असणारी लोकसंख्या. चीन आणि भारताच्या तुलनेत लोकसंख्या कमी आहे आणि त्यामुळे शेतीसाठी मोठा भूभाग उपलब्ध आहे. म्हणून येत्या दहा वर्षांत या क्षेत्रातून खाद्यपदार्थांची निर्यात ही 100 अब्ज डॉलर पोहोचू शकते.
लॅटिन अमेरिकेतील देश फायद्यात राहण्यामागे आणखी एक कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमध्ये असलेली स्पर्धा. परिणामी जग दोन गटांत विभागलेले आहे. गेल्या तीन वर्षांत पश्चिम देशांनी चीनमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. अशावेळी लॅटिन अमेरिकी देश हे अन्य देशांच्या तुलनेत अधिक तटस्थ आणि निष्पक्ष दिसतात. म्हणूनच पश्चिमी देश आणि चीन या क्षेत्रातून माल मागविण्यासाठी रुची दाखवत आहेत. याचा परिपाक म्हणजे मेक्सिकोने चीनऐवजी अमेरिकेला सर्वात मोठा व्यापारी भागीदार करण्यास विलंब लावला नाही. मँकेन्जीच्या एका ताज्या अहवालात म्हटले आहे की, लॅटिन अमेरिकी देशात 80 टक्के स्टार्टअप युनिकॉर्नचे लक्ष हे फिनटेक आणि ई-कॉमर्सवर केंद्रित आहे. तरीही या क्षेत्रात आठपट अधिक बौद्धिक संपत्ती आयात होते. अशावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने गगनभरारी घेतली तर लॅटिन अमेरिका सहजपणे अन्य क्षेत्राच्या तुलनेत मागे पडेल. अर्थात लॅटिन अमेरिकेच्या साम—ाज्यातील लक्ष्मी या संपूर्ण भागावर प्रसन्न आहे. परंतु लॅटिन अमेरिकेतील 33 देश यशस्वी ठरतील का, या संधीचा लाभ कसे उचलतात, यावर सर्व काही अवलंबून आहे.

SCROLL FOR NEXT