Latest

पुढारी दसरा दिवाळी शॉपिंग महोत्सवाचा शानदार प्रारंभ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकरांचा दसरा आणि दिवाळी खरेदीचा उत्साह द्विगुणित करणार्‍या 'पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2023' चा शुक्रवारी (दि. 13) शानदार प्रारंभ झाला. राजारामपुरी कमला कॉलेज जवळील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह परिसरात या फेस्टिव्हलचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, दैनिक 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर), रॉनिक होम अ‍ॅप्लायन्सेसचे संचालक तानाजी पवार, जय किसान आटा चक्कीचे संचालक अशोक गाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. 17 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 9 या वेळेत हा फेस्टिव्हल सुरू राहणार आहे.

यावेळी एमजी हेक्टर कोल्हापूरचे सरव्यवस्थापक अमोल पिसे, युनिक ह्युंदाईचे सरव्यवस्थापक किरण श्रेष्ठी, माई ह्युंदाईचे सरव्यवस्थापक विशाल वडेर, साई सर्व्हिसचे सागर पाटील, केआर ग्रुपचे करण सोनवणे, किया मोटर्सचे सीईओ संजय जगजंपी, काले बजाजचे संचालक अक्षय काले, एथर ई- बाईकच्या अर्चना घाटगे, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, दैनिक 'पुढारी'चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, सिनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर, जाहिरात व्यवस्थापक जावेद शेख व अतुल एकशिंगे, रिया भांदिगरे व मार्केटिंग प्रतिनिधी उपस्थित होते.

दसरा, दिवाळी म्हटले की खरेदी आलीच. घरात नवीन कपडे, घर सजावटीच्या वस्तू, वाहने खरेदी करण्यासाठी आवर्जून लोक दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त निवडतात. ग्राहकांना एकाच ठिकाणी परिपूर्ण भरपूर पर्यायांसह मनसोक्त खरेदीची संधी देणार्‍या 'पुढारी' दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हलची ग्राहकांच्या प्रचंड गर्दीत सुरुवात झाली.

सणांच्या खरेदीची संधी एकाच छताखाली देणार्‍या या फेस्टिव्हलमध्ये विविध उत्पादनांवर भरपूर डिस्काऊंट ऑफर देण्यात आल्या आहेत. होम अप्लायन्सेस, गारमेंट, होम डेकोर, ज्वेलरी, मसाले, बेकरी उत्पादने, आयुर्वेदिक प्रॉडक्ट या फेस्टिव्हलमध्ये उपलब्ध आहेत. रॉनिक स्मार्ट वॉटर हीटर आणि जय किसान शक्ती आटा चक्की या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक आहेत.

गृहोपयोगी वस्तूंसाठी भव्य दालन, ऑटोमोबाईलचा स्वतंत्र विभाग, फर्निचर, आटा चक्की, रोटी मेकर्स, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, कपडे, चहा व मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, शूज, ज्वेलरी, साड्यांच्या असंख्य व्हरायटी, फॅन्सी ड्रेस, ड्रेस मटेरियल, सजावटीच्या वस्तू, हेल्थ केअर, पर्सनल केअर, होम केअर असे शंभरांहून अधिक स्टॉल फेस्टिव्हलमध्ये गर्दी खेचत आहेत.

दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी उत्सुक असलेल्यांसाठी हा फेस्टिव्हल भरपूर व्हरायटी, अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने आणि अनेक उत्पादनांवर आकर्षक डिस्काऊंट घेऊन आला आहे.

वाहनांचे दालन ठरतेय लक्षवेधी

नामवंत कंपन्यांच्या चारचाकी, दुचाकी तसेच इलेक्ट्रिक वाहनांचा स्वतंत्र विभाग लक्षवेधी ठरत आहे. वाहन खरेदी करू इच्छिणार्‍यांना एकाच छताखाली सर्व नामवंत कंपन्यांची शोरुम्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी वाहनांची निवड करून ऑफरमध्ये गाडी बुक करण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT