सांगली, पुढारी वृत्तसेवा : पुढारी माध्यम समूह व महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे दरवर्षी होणारे 'पुढारी अॅग्रीपंढरी कृषी' प्रात्यक्षिकयुक्त लाईव्ह प्रदर्शनाचे आयोजन 16 ते 19 फेब्रुवारीपर्यंत केले आहे. प्रदर्शनाचे यंदा चौथे वर्ष आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे कृषी विभागाच्या जागेत हे प्रदर्शन होणार आहे.
शेतकर्यांना 50 हून अधिक पिके व प्रात्यक्षिके पाहण्याची संधी यानिमित्ताने दरवर्षी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. दरवर्षी दोनशेहून अधिक कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी होत असतात. ऑर्बिट क्रॉप न्यूट्रिएंट प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. प्रदर्शनात ठिबक सिंचन, अत्याधुनिक रोपण, निरनिराळे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, रोपण पद्धती, सोलर पंप, तुषार सिंचन, शेततळे कागद, शेडनेट, शेती अवजारे, ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, फवारणी यंत्रे आदी घटकांची माहिती मिळणार आहे.
उत्कृष्ट पीक उत्पादन स्पर्धा
शेतकर्यांना चांगले उत्पन्न घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी द्राक्षे, ऊस, केळी आणि हळद या गटामध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धा व प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन नोंदणी करण्यासाठी बाळासाहेब : 9850556009 या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क क्रमांक
या प्रदर्शनामध्ये स्टॉल बुकिंगसाठी सांगली प्रशांत : 8805007148, आलम : 7507023260 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
संपर्क :
पुणे : हरीश : 9922959108, छत्रपती संभाजीनगर : भगवान : 9881108011, संतोष 9881710934, मुंबई : अमित : 9892534445, नाशिक : बाळासाहेब वाजे : 9373911060, सोलापूर : सर्जेराव : 8668522600, पंढरपूर : सतीश : 9011035123, बेळगाव : विनायक : 9448994050, गोवा : कल्पेश : 8888163999, सिंधुदुर्ग : गणेश : 9421266727, रत्नागिरी : संजय : 9325291083, कोल्हापूर शहर : अतुल : 8805007237, कोल्हापूर ग्रामीण : जावेद : 8805007080, सातारा : मिलिंद : 8805007180 कराड : सतीश : 9881191302