Latest

‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’चे कुतूहल वाढले!

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी'च्या वतीने जानेवारी 2024 मध्ये 'पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम' परीक्षा घेण्यात येणार आहे. 'पुढारी' टॅलेंट सर्च एक्झाम' या शैक्षणिक उपक्रमाच्या प्रश्नावलीस नुकताच प्रारंभ झाला असून, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. प्रश्नावलीबाबत विद्यार्थ्यांचे कुतूहल वाढले असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठा प्रतिसाद लाभत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील एमपीएससी व यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, गोडी लागावी म्हणून दै. 'पुढारी'तर्फे जानेवारी 2024 मध्ये 'पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम' घेतली जाणार आहे. दै. 'पुढारी'मधील विश्वसंचार पानावर 1 ऑगस्टपासून प्रश्नावलीस प्रारंभ झाला आहे. शहरासह जिल्ह्यातील शाळा, हायस्कूलमध्ये या परीक्षेची माहिती सांगितली जात आहे.

विद्यार्थ्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. पालक स्पर्धा परीक्षेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेत आहेत. शिक्षकांकडूनही स्पर्धा परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांना नवी दिशा दाखविण्याचे काम सुरू आहे. 31 डिसेंबरपर्यंत दै. 'पुढारी' विश्वसंचार पानावर 150 प्रश्न विचारले जाणार आहेत. 'विश्वसंचार' पानावरील मजकुरावर आधारित 10 प्रश्न 20 गुणांसाठी परीक्षेत विचारले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना 15 लाख रुपयांची भरघोस बक्षिसे मिळणार आहेत. परीक्षेसाठी अर्ज करण्याची 10 ऑगस्ट अंतिम मुदत आहे.

कोल्हापूर शहर, जिल्ह्यासाठी संपर्क क्रमांक

(कोल्हापूर शहर) : 7620247676/ 8805007298. (कोल्हापूर जिल्हा) कागल-राधानगरी-गगनबावडा : 7387465000, करवीर-भुदरगड : 8805020625, गडहिंग्लज-आजरा-चंदगड : 7758087122, शाहूवाडी-पन्हाळा : 8805007117, हातकणंगले-शिरोळ : 9923128116, इचलकरंजी शहर : 8805021752.

SCROLL FOR NEXT