Latest

PRS Oberoi Passes Away: ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे प्रमुख पीआरएस ओबेरॉय यांचे निधन

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे मानद अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचे निधन मंगळवारी निधन झाले. त्यांनी आज सकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ओबेरॉय समुहाचे प्रमुख पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांनी भारताच्या हॉटेल इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलला, त्यामुळे देशातील हॉटेल इंडस्ट्रीत महत्त्वाचे स्थान होते.

पृथ्वी राज सिंग ओबेरॉय किंवा PRS ओबेरॉय  यांचा जन्म १९२९ मध्ये नवी दिल्ली येथे झाला. त्यांचे शिक्षण भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) आणि स्वित्झर्लंडमध्ये झाले. ते 'द ओबेरॉय ग्रुपची प्रमुख कंपनी' EIH लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष होते. देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक लक्झरी हॉटेल्स उघडून आंतरराष्ट्रीय लक्झरी प्रवाशांसाठी अनेक ओबेरॉय हॉटेल्सची उभारणी केली आहे. भारताच्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स इंडस्ट्रीमधील त्यांच्या कार्याबद्दल २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये EIH लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे ​​अध्यक्षपद सोडले.

EIH लिमिटेड वेबसाइटनुसार, ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक लक्झरी हॉटेल्स सुरू करून आंतरराष्ट्रीय लक्झरी प्रवाशांच्या नकाशावर ओबेरॉय हॉटेल्स ठेवण्याचे श्रेय पीआरएस ओबेरॉय यांना देण्यात आले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT