Latest

Pune Maratha Reservation : नवले पुलावरील आंदोलनातील ५०० जणांवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पुणे : मराठा आरक्षणासाठी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आंदोलन केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पाेलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी या संदर्भात सिंहगड रस्ता पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मंगळवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आंदोलकांनी टायर पेटविल्याने वाहतूक ठप्प झाली. खेड-शिवापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT