Latest

Chinese President Jinping : ‘नो टू ग्रेट लीडर’ पोस्टरमुळे चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष जिनपिंग यांच्‍या ‘हुकूमशाही’विरोधात संतापाची लाट

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्षी जिनपिंग यांची चीनच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदी १६ ऑक्‍टोबर रोजी नियुक्‍ती झाली.  ( Chinese President Jinping ) सलग तिसर्‍यांदा त्‍यांना हा बहुमान मिळाला. मात्र त्‍यांची फेरनिवड हाेण्‍यापूर्वी  दोन दिवस आधी म्‍हणजे १४ ऑक्‍टोबरला चीनची राजधानी बीजिंगमधील एका पुलावर जिगपिंग यांना हटविण्‍यासाठी 'नो टू ग्रेट लीडर' असे निषेधाचे बॅनर लावण्‍यात आले हाेते. या बॅनवरवर चीनमधील कोरोना काळातील लॉकडाउन आणि निर्बंधावर टीका करण्‍यात आली होती. आता हेच बॅनर चीनमधील हुकूमशाहीविरोधात संतापाची लाट उसळण्‍यास कारणीभूत ठरले आहे. चीनमधील आठ शहरांमध्‍ये लोकशाही समर्थक नागरिकांकडून छुप्‍या पद्‍धतीने जिनपिंग यांच्‍या हुकूमशाहीचा तीव्र निषेध होत असल्‍याचे वृत्त 'ब्‍लूमबर्ग'ने दिले आहे.

चीनमधील आठ शहरांमध्‍ये राष्‍ट्राध्‍यक्षांचा तीव्र निषेध

चीनमधील लोकशाही समर्थकांकडून 'व्‍हॉईस ऑफ सीए' नावाने इंस्‍टाग्राम खाते चालवले जाते. चीनमधील लोकशाही समर्थक गटातील एका सदस्‍य 'ब्‍लूमबर्ग'शी बोलताना म्‍हणाला की, "चीनमधील शेन्झेन, शांघाय, बीजिंग आणि ग्वांगझू, हाँगकाँग अशा सुमारे आठ शहरांमध्‍ये जिनपिंग यांना हटविण्‍याच्‍या नागरिक आंदोलन करत आहेत."

Chinese President Jinping : सार्वजनिक स्‍वच्‍छतागृह बनली निषेधाची केंद्रे

'व्‍हॉईस ऑफ सीए'ने दिलेल्‍या माहितीनुसार, चीनमधील बहुतांश सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्‍ही कॅमेरे आहेत. त्‍यामुळे लोकशाही समर्थन नागरिकांचा आता छुप्‍या पद्‍धतीने आपला निषेध नाेंदवत आहेत. काही शहरांमधील सार्वजनिक स्‍वच्‍छतागृह आता निषेधाची केंद्रे बनली आहेत. जिनपिंग यांच्‍या निषेधाचे फलक हे सार्वजनिक स्‍वच्‍छतागृहांसह काही शाळांमधील नोटिसबोर्डवरही लावण्‍यात येत आहेत. बीजिंगमधील चायना फिल्‍म आर्काइव्‍ह आर्ट सिनेमागृहाततही 'हुकूमशाहीला नकार द्या', असे भित्तिचित्र काढण्‍यात आले आहे. तसेच अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि अन्‍य काही देशातील २०० हून अधिक विद्यापीठांमध्ये शी जिनपिंग यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्‍यात येत आहे.

सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्मवरुन काढून टाकले निषेधाचे शब्‍द!

'व्‍हॉईस ऑफ सीएन'च्‍या प्रतिनिधीने सांगितले की, जिगपिंग यांच्‍याविरोधात बॅनर लावणारे बहुतांश विद्यार्थी आजवर झालेल्‍या दडपशाहीचा निषेध करत आहेत. चीनमध्‍ये राष्‍ट्राध्‍यक्षांविरोधातील आंदोलना करणार्‍यांना दीर्घकाळ तुरुंगावासाच्‍या शिक्षेची तरतूद आहे. त्‍यामुळे जिनपिंग यांना छुप्‍या मार्गाने विरोध केला जात आहे. चीनने सर्व सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्मवरुन बीजिंग विरोधक, सिटॉन्‍ग बिझज हे शब्‍द काढून टाकले आहेत. तर 'बीसीसी' या वृत्तसंस्‍थेने म्‍हटले आहे की, चीनने सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्मवरुन ब्रिज, हिरो या शब्‍दांना प्रतिबंध आहे.

SCROLL FOR NEXT