Latest

Gitanjali Aiyar passes away : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ३० वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर बातम्या देणार्‍या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे बुधवारी, ७ जून रोजी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे प्रसारमाध्यमांमध्ये शोककळा पसरली आहे. गीतांजली अय्यर या दूरदर्शनवरील इंग्रजी वृत्तनिवेदकांपैकी एक होत्या ज्यांनी ३ दशके बातम्या सादर केल्या. (Gitanjali Aiyar passes away)

१९७१ मध्ये ते दूरदर्शनमध्ये रुजू झाल्या होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत चार वेळा सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदिकचा पुरस्कार जिंकला आहे. पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्य, कामगिरी आणि योगदानासाठी १९८९ मध्ये उत्कृष्ट महिलांसाठीचा इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार प्राप्त झाला होता. (Gitanjali Aiyar passes away)

गीतांजली अय्यर यांनी कोलकात्याच्या लोरेटो महाविद्यालायातून इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण घेतली होती. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमाही केला होता.

दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदक म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, सरकारी संबंध आणि मार्केटिंगमध्ये प्रवेश केला. त्यांनी भारतीय उद्योग परिसंघ (CII) मध्ये सल्लागार काम पाहिले तसेच "खानदान" या मालिकेतही काम केले होते.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT