Latest

शिकागो सर्वधर्म परिषदेस प्रा. नामदेवराव जाधव निमंत्रित

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिकागो येथे दि. 14 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीत होणार्‍या सर्वधर्म परिषदेस संबोधन करण्यासाठी ज्येष्ठ इतिहासकार, लेखक प्रा. नामदेवराव जाधव यांना निमंत्रित केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्यानंतर 130 वर्षांनी सर्वधर्म परिषदेला संबोधन करण्याची संधी प्रा. जाधव यांना मिळाली असून, यानिमित्त दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी प्रा. जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

जगातील सर्वोच्च व्यासपीठ समजली जाणारी सर्वधर्म परिषद यावर्षी शिकागो, अमेरिका येथे संपन्न होत आहे. या सर्वधर्म परिषदेसाठी हिंदू धर्माचे आणि भारताचे प्रतिनिधित्व प्रा. नामदेवराव जाधव करणार आहेत.

शिकागो येथे 1893 साली झालेल्या सर्वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व स्वामी विवेकानंद यांनी केले होते. 130 वर्षांनंतर हा बहुमान पुन्हा भारताला मिळाला.

प्रा. नामदेवराव जाधव शिकागो येथे हिंदू धर्म आणि मानवाधिकार या आजच्या ज्वलंत प्रश्नावर बोलणार आहेत. हिंदू धर्म कसा जगातील सर्वात प्राचीन आणि महान आहे आणि तो मानवाधिकार यासंदर्भातील कसा जगाला मार्गदर्शक आहे, याबाबत आपले विचार मांडणार आहेत. जगातील 240 देशांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

प्रा. जाधव 12 ऑगस्ट रोजी भारतातून शिकागोला जाणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवदिनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता ते शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतून संबोधन करणार आहेत.

SCROLL FOR NEXT