पुढारी ऑनलाईन डेस्क : वेलकम-हेराफेरी चित्रपटाचे निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अब्दुल गफ्फार यांनी आज सकाळी मुंबईतील कॅंडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अब्दुल गफ्फार दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अब्दुल गफ्फार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा जेवीपीडी स्क्रीम येथील त्यांचे निवासस्थान बरकतपासून सुरू होईल. अंतिम संस्कार इरला मस्जिदमध्ये केलं जाईल. याची माहिती फिरोज नाडियादवाला यांनी दिली. चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांचे ते वडील होते.
अनेक हिट चित्रपटांची निर्मिती
वेलकम, आवारा पागल दिवाना यांसारख्या चित्रपटांची निर्मिती अब्दुल यांनी केली होती. अब्दुल गफ्फार यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपटांची निर्मिती केली. गफ्फार भाई नावाने प्रसिद्ध असलेले चित्रपट निर्माते १९८४ पासून चित्रपटसृष्टीचा एक भाग होते. निर्माता म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होता. धर्मेंद्र आणि रेखा स्टारर फॅमिली ड्रामा 'झूठा सच'. प्रियदर्शन दिग्दर्शित 'हेरा फेरी' या विनोदी चित्रपटाचीही त्यांनी निर्मिती केली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. याशिवाय त्यांनी वेकलम, आवारा पागल दिवाना, आ लगे लग जा, शंकर शंभू, वतन के रखवाले, सोने पे सुहागा यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.
६९ वर्षांच्या कारकीर्दीत ५० हिंदी चित्रपट
अब्दुल गफ्फार यांनी त्यांच्या ६९ वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास ५० हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी १९६५ मध्ये प्रदीप कुमार आणि दारा सिंह अभिनीत महाभारत चित्रपटाची निर्मिती केली हाेती. अब्दुल गफ्फार हे त्यांच्या चित्रपटांबद्दल खूप उत्साही म्हणून ओळखले जात होते.
कुटुंबातील प्रत्येकजण चित्रपट निर्माता
ए जी नाडियादवाला यांचे वडील ए के नाडियाडवाला हे देखील निर्माते होते. त्यांचा मुलगा फिरोज नाडियाडवाला आणि चुलत भाऊ साजिद नाडियाडवाला हे देखील निर्माते आहेत. साजिदचे वेगळे प्रोडक्शन हाऊस असले तरी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य चित्रपट निर्माते आहेत.