Latest

Priyanka Gandhi | मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा यांच्यानंतर प्रथमच प्रियांका गांधींचे नाव

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्रात प्रियंका गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. आरोपपत्रात यापूर्वी रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचा उल्लेख होता, त्यानंतर ईडीच्या समोर आलोल्या आरोपपत्रात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे देखील नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. (Priyanka Gandhi)

ईडीने हरियाणाच्या फरीदाबादमधील पाच एकर शेतजमिनी ताब्यात घेतल्या आणि त्यानंतर विकल्याचा उल्लेख करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आरोपपत्रात समावेश केला आहे. संबंधित जमिनीचा व्यवहार 2006 मध्ये झाला होता, जिथे प्रियंका गांधी यांनी दिल्लीस्थित रिअल इस्टेट एजंट एच एल पाहवा यांच्याकडून मालमत्ता खरेदी केली होती आणि नंतर फेब्रुवारी 2010 मध्ये ती त्यांना परत विकली होती. ईडीच्या तपासाने या प्रकरणाचा संबंध फरार शस्त्र व्यापारी संजय भंडारी याच्या मोठ्या तपासाशी जोडला गेला आहे. (Priyanka Gandhi)

अंमलबजावणी संचालनालयाने प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपपत्रात दाखल केला. यानंतर दोन दिवसांनी हा प्रकार घडला आहे. ईडीने कथित मध्यस्थ संजय भंडारी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित लंडनच्या मालमत्तेचे नूतनीकरण आणि राहण्याचा आरोप केला. या प्रकरणाचा संबंध फरारी शस्त्र विक्रेता भंडारी याच्या मोठ्या तपासाशी आहे. हा तपास मनी लाँड्रिंग, परकीय चलन आणि काळ्या पैशाच्या कायद्यांचे उल्लंघन आणि अधिकृत गुप्तता कायदा यावर केंद्रित आहे. (Priyanka Gandhi)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT