Latest

Priyanka Chopra : प्रियांकाला खूप भीती वाटायची आणि बाथरूममध्ये जेवण..!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : मी खूप घाबरले होते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांत मी दुपारचे जेवण बाथरूममध्ये करायचे. कॅफेटेरियापर्यंत कसे जायचे आणि जेवण कसे घ्यायचे, हे मला माहीत नव्हते. मी पटकन जवळच्या स्टॉलमधून जेवण आणायचे आणि बाथरूममध्ये गुपचूप खात असल्याचा धक्कादायक खुलासा प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने केला आहे.

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या 'सिटाडेल' या सीरिजमुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने ती मुलाखती देत आहे. एका मुलाखतीत प्रियांकाने पहिल्यांदा अमेरिकेत गेल्यानंतर नेमके काय घडले याबद्दलचा अनुभव सांगितला. प्रियांका म्हणाली, जेव्हा ती शिक्षणासाठी पहिल्यांदा अमेरिकेत आली होती. ती खूप घाबरली होती. तेव्हात ती किशोरवयात होती. सुरवातीच्या काळात ती खूप भीतीखाली जगत होती. अमेरिकेत तिला रूळायला खूप वेळ लागला. आत्मविश्वासाची कमी, भीती आणि एकाकीपणामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि ती सध्या हॉलीवूडमध्ये काम करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT