Latest

Taloja Jail : तळोजा तुरुंगातील कैद्यांना ‘हायटेक’ सुविधा मिळणार!

अनुराधा कोरवी

पनवेल : विक्रम बाबर :  तळोजा कारागृहतील कैद्यांना आत्ता 'हायटेक' सुविधेचा लाभ घेता येणार आहे. आज तळोजा मध्यवर्ती कारागृहात बसवण्यात आलेल्या हायटेक सुविधांचे उद्घाटन अप्पर पोलिस महासंचालक प्रभात कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या हायटेक सुविधेमध्ये ई मुलाखत, ऑलन टेलिफोन सुविधा, किऑस मशीन सुविधाचा समावेश आहे. या हायटेक सुविधे मधील ऑलन फोन च्या माध्यमातून कैद्यांना आपल्या सहा नातेवाईकांना महिन्यातून 12 कॅल करण्याची सुवधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. ( Taloja Jail )

संबंधित बातम्या 

त्यासोबत ई मुलाखतीच्या माध्यमातून कुटूंबा सोबत बोलता येणार आहे. त्या सोबत महिन्याची खाद्यपदार्थ खरेदी देखील ऑनलाइन करता येणार आहे. या सोबत या न्यायालयीन तारखा, पॅरोल ची माहिती कैद्याना एका क्लीक वर मिळणार आहे. या सर्व सोयी सुविधा कैद्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेळी अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अभिजीत गुप्ता, अधीक्षक तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रमोद वाघ उपाधीक्षक महादेव पवार उपस्थित होते.तळोजा तुरुंग हे स्वातंत्र्यानंतरचे राज्यातील पहिले तुरुंग आहे.

सन 2008 मध्ये सुरू झालेल्या तुरुंगात सध्याच्या घडीला 2 हजार 919 प कैदी शिक्षा भोगत आहेत. या कैद्यामध्ये इसिस संघटना, औरंगाबाद शस्त्रआरोपी, पुणे बॉम्बब्लास्ट, इंडियन मुजाहिद्दीन संघटना, 1993 बॉम्बस्फोट मधील आरोपी तसेच गँगवर मधील आरोपीचा समावेश आहे. या सह अन्य आरोपी या कारागृहात शिक्षा भोगत आहे. या कैद्याना आता कारागृहाने उपलब्ध करून दिलेल्या हायटेक सुविधेचा वापर करता येणार. या मध्ये ई-कियोस्क हे तंत्रज्ञात स्वीकारले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे कैद्यांना न्यायालयाच्या तारखा आणि पैरील स्थिती यांसारखी महत्त्वाची माहिती मिळणार आहे.

या बायोमेट्रिक टचस्क्रीन मशीनमुळे कैद्यांना कुटुंबातील सदस्यांच्या सेलफोन नंबरवर सणाच्या शुभेच्छा पाठवता येणार आहेत. त्या सोबत महिन्याची खाद्यपदार्थ खरेदी देखील ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. या सोबत ऑलन टेलिफोन सुविधा देण्यात आली आहे. या टेलिफोन सुविधे च्या माध्यमातून कुटूंबातील केवळ 6 सदस्यांना महिन्यातून 12 कॅल करता येणार आहे. तसेच कैद्यासाठी ई मुलाखत, प्रतीक्षालय, कोर्टपेशी या सुविधी देण्यात आल्या आहे. याचे उदघाटन आज संपन्न झाले या सुविधा उपलब्ध करून देणारे हे पहिले कारागृह असणार आहे.

कैद्यांच्या डाएट कॉलिटी सोबत फूड कॉलीटीमध्ये सुधारणा करणार

कैद्यांना कायद्या नुसार मिळणार्‍या सुविधा पैकी, त्याच्या खाण्या पाण्यावर आमचे कारागृह विषेश लक्ष देऊन आहे. त्याच्या खाण्याचा दर्जा उंचावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खाण्याचा दर्जा उंचावल्या मुळे, त्यांची दाईट कॅलिटीही सुधारणार आहे. त्या सोबत कारागृहाच्या पटांगणात आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT