Latest

कोल्हापूर : बिंदू चौकातील सब जेलमधून परप्रांतीय कैद्याचे पलायन

स्वालिया न. शिकलगार

कोल्हापूर – पुढारी वृत्तसेवा : बिहार राज्यातील चोरट्याने येथील बिंदू चौकातील सब जेलमधून शुक्रवारी सकाळी धूम ठोकल्याने कारागृह आणि पोलीस प्रशासन कमालीचे धास्तावले आहे. सदर कैदी चोरी घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार आहे.

धनराज कुमार (वय २५, रा. अहमदपूर, जिल्हा बेला सारंग बिहार) असे सराईत चोरट्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.

कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याच्या शोधासाठी शहर जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. शाहूपुरी पोलिसांनी संशयित धनराज कुमार याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. २३ सप्टेंबरला त्याची बिंदू चौक येथील सब जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती.

SCROLL FOR NEXT