Latest

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पत्र

अमृता चौगुले

पुणे, पुढारी ऑनलाईन: पिंपरी-चिंचवडचे नेते आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे सांत्वन केले आहे. चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी एका खासगी रुग्णालयात निधन झाले. हे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगताप कुटुंबियांना पत्र पाठवून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अतीव दुःख झाले. या कठीण काळात माझ्या संवेदना जगताप कुटुंबियांसोबत आहेत. सहज आणि सरळ व्यक्तिमत्त्व असणारे लक्ष्मणभाऊ हे जमिनीशी जुळलेले नेते होते. ते लोककल्याणासाठी सदैव समर्पित राहिले. पुणे आणि पिंपरीचिंचवड परिसराच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेसाठी लोक त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतील. त्यांच्या निधनाने भाजप आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. लक्ष्मण जगताप हे आपल्या परिवारासाठी मजबूत आधार होते. ते आज या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांची जीवनमुल्ये जगताप कुटुंबासोबत कायम राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT