Latest

PM Modi : एनडीए गरिबांसाठी काम करेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : PM Modi : विरोधी पक्षांना जाती-पातीचे राजकारण करू द्या. आपण गरिबांसाठी काम करायचे असल्याचे लक्षात ठेवून आपल्या कामाचा लेखाजोखा घेऊन गरिबांपर्यंत जावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एन.डी.ए.) बैठकीत दिला.

भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ खासदारांच्या दोन वेगवेगळ्या बैठकींना मोदी यांनी आज मार्गदर्शन केले.पहिली बैठक उत्तरप्रदेशातील मित्र पक्षांच्या खासदारांसोबत आणि दुसरी बैठक दक्षिण भारतातील घटकपक्षांच्या खासदारांंसोबत मोदी यांनी बैठक आयोजित केली होती. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह मित्र पक्षाच्या खासदारांना मार्गदर्शन करताना मोदी (PM Modi) म्हणाले की, विरोधकांच्यावतीने जाती-पातीचे राजकारण केले जाते आहे. आपल्याला केवळ एक जातीसाठी काम करायचे आहेत. ती जात म्हणजे गरिब. त्यामुळे विरोधकांच्या संकुचित राजकारणाकडे दुर्लक्ष करून गरिबांच्या उथ्थानासाठी काम करू.

मतदारसंघात नवीन कामे करण्यापेक्षा प्रत्येक खासदाराने आपापल्या मतदारसंघात जावून केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे. यासाठी प्रत्येक खासदाराने सोशल मीडियाचा खुबीने वापर करावा. यासाठी सोशल मीडियातील तज्ज्ञांची टीम नियुक्त करावी. मतदारसंघामध्ये कॉल सेंटरच्या धर्तीवर केंद्राची स्थापना करावी,अशा महत्वपूर्ण

सूचनाही त्यानी यावेळी दिल्या. ते पुढे म्हणाले की, इंडिया या विरोधी आघाडीच्यावतीने जनतेमध्ये भ्रमाचे वातावरण पसरविले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदारांनी आपल्या मतदारापर्यंत वास्तव परिस्थिती पोहोचवली पाहिजे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रालोआमधील समन्वय राखण्यासाठी मोदी यांनी सोमवारपासून रालोआतील खासदारांसोबत बैठकांचे सत्र आरंभले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT