Latest

खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या आवळण्याची भारताची मागणी

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कॅनडात वाढत असलेल्या भारतविरोधी घटना आणि तेथे वाढत असलेला खलिस्तानवाद्यांचा वाढलेला उपद्रव चिंताजनक असून कॅनडाने या खलिस्तानवाद्यांना आवर घालावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना सांगितले.

ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलिस्तानवाद्यांच्या उपद्रवाचा विषय काढला. कॅनडातील खलिस्तानी फुटीरवादाला पाठबळ देण्तानाच लोकांना भारताीय दुतावासातील अधिकार्‍यांच्या विरोधात भडकावत आहेत. तेथील दूतावासावर हल्ले करीत आहेत आणि भारतीय समुदायावर हल्लेही करीत आहेत. कॅनडातील खलिस्तानवादी ड्रग्ज, संघटीत गुन्हेगारी व मानवी तस्करीसारख्या प्रकारांतही सहभागी असतात. हा कॅनडालाही धोका असून त्यामुळे कॅनडाने त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मोदी यांनी ट्रुडो यांना सांगितले.

त्यावर ट्रुडो यांनी सांगितले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कॅनडा समर्थन करीत असला तरी ते शांतापूर्णच असायला हवे अशी आमची भूमिका आहे. कोणत्याही प्रकारचा द्वेष अथवा हिंसा यांना उत्तेजन देण्याचे प्रकार कॅनडा कदापि सहन करणार नाही.

दरम्यान, ट्रुडो रविवारी सायंकाळी मायदेशी रवाना होणार होते मात्र त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना रविवारी दिल्लीतच मुक्काम करावा लागला.

SCROLL FOR NEXT