कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात शनिवारी जाहीर सभा होणार आहे. तपोवन मैदानावर सायंकाळी 5 वा. सभा होईल, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यान, नियोजित दौर्यानुसार पंतप्रधान मोदी यांची 28 एप्रिल रोजी सभा होणार होती. परंतु त्यात आता बदल झाला आहे. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.